आदिवासी शिक्षक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

By Admin | Updated: November 11, 2015 22:20 IST2015-11-11T22:19:46+5:302015-11-11T22:20:43+5:30

इगतपुरी : नकाशे आत्महत्त्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tribunal's request for tahsildar | आदिवासी शिक्षक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

आदिवासी शिक्षक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

इगतपुरी : नकाशे आत्महत्त्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणीआदिवासी शिक्षक संघटनेचे तहसीलदारांना निवेदनइगतपुरी : पंचायतराज कमिटीच्या दहशतीमुळे कारवाईच्या भीतीपोटी आत्महत्त्येचा मार्ग पत्करणाऱ्या प्रामाणिक विजय नकाशे या शिक्षकाच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करावी, असे निवेदन बुधवारी महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने इगतपुरीचे तहसीलदार महेंद्र पवार यांना दिले.
अमरावती जिल्ह्यातील सोमडोह येथील प्राथमिक शिक्षक विजय नकाशे यांनी काही दिवसांपूर्वी गळफास घेत आत्महत्त्या केली होती. शासनाच्याइगतपुरी येथील तहसील कार्यालयात विजय नकाशे मृत्यूप्रकरणी निवेदन तहसीलदार महेंद्र पवार यांना देताना महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस निवृत्ती तळपाडे, अध्यक्ष उत्तम भवारी, सरचिटणीस भाऊराव बांगर, कार्याध्यक्ष जनार्दन करवंदे, कोषाध्यक्ष गणेश घारे आदि. आदेशानुसार पोषण आहाराची जबाबदारी मुख्याध्यापकां-कडून काढण्यात आलेली असताना त्यांना विनाकारण वेठीस धरण्यात येत आहे. विजय नकाशे यांना केवळ तीस किलो तांदळाचा मेळ लागत नसल्याने पंचायतराज समितीच्या सदस्यांनी यांना बाजू मांडण्याची संधी दिली नाही. त्यामुळे मानसिक वैफल्यातून त्यांनी जीवन संपविल्याचा जो कटु निर्णय घेतला त्यासाठी पंचायतराज समिती हीच सर्वस्वी जबाबदार असून, सदर कमिटीच्या सदस्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे याचा दीर्घ परिणाम सर्व शिक्षकांवर होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
नकाशे यांच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी शासनाने घ्यावी यासह या प्रकरणी शिक्षकांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक प्राथमिक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस निवृत्ती तळपाडे, उत्तम भवारी, सरचिटणीस भाऊराव बांगर, कार्याध्यक्ष जनार्दन करवंदे, कोषाध्यक्ष गणेश घारे यांनी तहसीलदार पवार यांच्याशी या प्रश्नी चर्चा केली. निवेदन देताना निवृत्ती तळपाडे, जनार्दन केकरे, दत्ता साबळे, शिवाजी कौले, मारुती धादवड, गोरख तारडे, जनार्दन खादे, रामदास लोहरे, भाऊराव कोरडे, शिवनाथ भागवत, सखाराम भांगरे, संतू मेमाने पोपट भांगे, राज कातोरे, उत्तम भवारी आदिंसह शिक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Tribunal's request for tahsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.