शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी तरुणांना मिळणार ५ लाखांपर्यंत कर्ज, शबरी महामंडळाची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:56 IST

Shabari Mahamandal scheme : सध्या आदिवासी तरुणांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदरात कर्जपुरवठा उपलब्ध करून  दिला जात आहे.

नाशिक : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासींच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सध्या आदिवासी तरुणांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदरात कर्जपुरवठा उपलब्ध करून  दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांच्याशी साधलेला संवाद. 

आदिवासी तरुणांना कोणत्या स्वरूपात कर्ज दिले जाते? पाच वर्षांपासून बंद असलेल्या योजनेचे केंद्र शासनाने पुनरुज्जीवन केले असून, या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी  ४ ते ६ टक्के इतक्या अल्प दरात एक ते पाच लाखांपर्यंत कर्ज  दिले जात आहे. या योजनेसाठी २५ कोटींचा निधी मंजूर  करण्यात आला असून, राज्यभरातून १,३०० लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.  योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. महिला सशक्तीकरण, स्वयंसहायता बचतगट आणि मुदत कर्ज अशा वेगवेगळ्या योजनांतर्गत कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. 

खावटीची रक्कम कधीपर्यंत मिळेल?खावटी योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यासाठी खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात लाभार्थींना रोख रक्कम देण्यात येणार असून, त्यानंतर धान्य वाटप करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सुरू होण्यास किमान महिनाभराचा अवधी लागेल. राज्यात साडेअकरा लाख लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. 

कोरोनाच्या काळात महामंडळांकडून कोणती मदत करण्यात आली? आदिवासी विकास महामंडळामार्फत मागील वर्षी विक्रमी धान खरेदी करण्यात आली. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना ऐन लॉकडाऊनच्या काळात पैसा उपलब्ध झाला. खुल्या बाजारापेक्षा आमच्याकडे धानाला दुप्पट दर दिला जात असल्याने महामंडळाच्या खरेदी केंद्रांवर धान विक्रीस शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिली. गतवर्षी ५० लाख टन धान खरेदी करण्यात आली.

टॅग्स :MONEYपैसाNashikनाशिक