आदिवासी महिलांचा ठिय्या
By Admin | Updated: March 20, 2016 23:04 IST2016-03-20T22:58:08+5:302016-03-20T23:04:09+5:30
खमताणे : इंदिरा आवास घरकुल योजनेपासून वंचित

आदिवासी महिलांचा ठिय्या
सटाणा : तालुक्यातील खमताणे येथील ग्रामसेवक आर. आर. सोनवणे यांच्या मनमानी व बेजबाबदारपणामुळे येथील लाभार्थींना इंदिरा आवास घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.
घरकुल योजनेच्या प्रतीक्षा यादीतील खऱ्या लाभार्थींना डावलून इतरांना घरकुलांचा लाभ देण्यात येत असल्याचा आरोप सोनवणे यांच्यावर महिलांनी केला आहे.
उपसरपंच नितीन वाघ व धडाडीच्या ग्रामपंचायत सदस्य बेबीबाई कराटे यांनी याबाबत ग्रामसेविका सोनवणे यांना याबाबत सूचित केले; मात्र तुम्ही माझी तक्र ार कुठेही करा, अशीही माझी प्रशासकीय बदली होणार असून तुम्ही माझी वरिष्ठांकडे तक्रार केल्यास माझी तालुक्यात अन्यत्र बदली होऊन उलट तुमच्या तक्रारीचा फायदा होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. याउलट ग्रामपंचायत सदस्य मला शिवीगाळ करत असल्याची तक्रार संबंधित ग्रामसेवक सोनवणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असून सदस्यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.
यावेळी सदस्य अमोल वाघ, पंडित इंगळे, मेनका बच्छाव, बेबी कराटे, सिंधूबाई बागुल, रंजना वाघ यांच्यासह अंजना बोरसे, बायजाबाई बोरसे, संतोष पवार, अशोक माळी, कडू पवार, दादाजी बोराळे, वसंत पवार, गोकुळ खरे, दीपक खरे, रवींद्र बच्छाव उपस्थित होते. (वार्ताहर)