आदिवासी बचावकृती समितीतर्फे

By Admin | Updated: August 2, 2014 01:23 IST2014-08-01T23:40:43+5:302014-08-02T01:23:47+5:30

तहसिल कार्यालयावर आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन

Tribal Rescue Committee | आदिवासी बचावकृती समितीतर्फे

आदिवासी बचावकृती समितीतर्फे

सुरगाणा : आदिवासी जमातीच्या आरक्षणात धनगर जातीचा समावेश करू नये यासाठी आदिवासी समाज बचाव कृती समितीतर्फे तहसिल कार्यालयावर आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी हजारो समाज बांधव, विद्यार्थी, आदिवासी सामाजिक संघटना, आदिवासी कर्मचारी संघटना, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चासाठी सर्वच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने पोलीस परेड मैदानावर एकत जमले घोषणा देत, हातात बॅनर घेत मोर्चा बसस्थानक तेलीगल्ली मार्गे तहसील कार्यालयात पोहचला, या मोर्चाचे रूपांतर तहसिल कार्यालयाच्या आवारात सभेत झाले.
यावेळी माजी आमदार जीवा गावीत, हेमंत वाघेरे, भिका राठोड, सुभाष चौधरी, उर्मिला गावित, सावळीराम पवार, रंजित गावित, समीर चव्हाण, पी. के. चव्हाण, आर. डी. भोये, जयराम गावित, राम चौरे, राजेश गावित, पंकज ठाकरे, तुळशिराम खोटरे, ज्ञानदेव पवार, आर. एच. गांगुर्डे, विद्यार्थी प्रतिनिधी परशराम बिरारी, माधुरी गवळी, डॉ. हिरामण गावित, धमेंद्र पगारीया यांनी मनोगत व्यक्त केले. या आरक्षण बचाव कृती समितीमध्ये आदिवासी कर्मचारी संघटना, विश्वास फ्रेंड सर्कल, हिंदुस्थानी कला व क्रिडा प्रसारक मंडळ सुरगाणा, युवा फेरडरेशन, स्टुडंट फेडरेशन शाखा सुरगाणा, आदिवासी हक्क संरक्षण समिती सह विविध आदिवासी संघटना सहभागी झाल्या होत्या.
या मोर्चात हिरामण गावित, वसंत बागुल, भाजपाचे तालुका अध्यक्ष सुरेश गवळी, मनसेचे तालुका अध्यक्ष मनोहर खंबायत, जयराम गावित, काशिनाथ गायकवाड, वसंत राठोड, गंगाराम गावित, राष्ट्रवादीचे सरचिटणीस भास्कर चौधरी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी एस. के. चौधरी, पांडुरंग पवार, प्रभाकर महाले, नामदेव चौधरी, सुधाकर भोये सह सुमारे पाच हजारपेक्षा जास्त आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी तहसिलदार रशिद तडवी यांना निवेदन सादर करणेत आले. मोर्चाचा अध्यक्षस्थानी उपसभापती इंद्रजित गावित होते तर सूत्रसंचलन रतन चौधरी यांनी केले.
फोटो - १) तहसिलदार रशिद तडवी यांना निवेदन सादर करतांना मा.आमदार जे. पी. गावित, राम चौरे, इंद्रजित गावित, समिर चव्हाण, जयराम गावित, प्रभाकर महाले आदी.
२) मोर्चात सहभागी सभापती मंदाकिनी भोये, इंद्रजित गावितसह महाविद्यालयातील विद्यार्थी
३) आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीला मार्गदर्शन करतांना जे. पी. गावित.

Web Title: Tribal Rescue Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.