शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास महामंडळ उभारणार ‘ट्रायफूड’ केंद्र, केंद्रांना निधीचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 08:10 IST

कोरोना संकटाच्या काळात राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने वनधन केंद्रांना सुमारे आठ कोटी रुपये निधीचे वाटप केल्याने या केंद्रांवर काम करणाऱ्या गोरगरीब आदिवासींना मोठा दिलासा मिळाला असून, लॉकडाऊनमध्येही त्यांना रोजगार मिळाला आहे.

नाशिक : कोरोना संकटाच्या काळात राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने वनधन केंद्रांना सुमारे आठ कोटी रुपये निधीचे वाटप केल्याने या केंद्रांवर काम करणाऱ्या गोरगरीब आदिवासींना मोठा दिलासा मिळाला असून, लॉकडाऊनमध्येही त्यांना रोजगार मिळाला आहे. दरम्यान, राज्यभरातील आदिवासी गोळा करीत असलेले गौण वनउपज एकाच छताखाली मिळण्यासाठी महामंडळ ट्रायफूड केंद्र सुरू करणार आहे.केंद्र शासनाने आधारभूत किमतीवर गौण वनउपज खरेदी योजना सुरू केली असून, सन २०१४ पासून आदिवासी विकास महामंडळामार्फत गौण वनउपज खरेदी केली जाते. या योजनेला केंद्र शासनाच्या अखत्यारीतील ट्रायफूडच्या माध्यमातून अर्थसाहाय्य दिले जात असून, यासाठी राज्यभरात वनधन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. अनुसूचित क्षेत्राखालील राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जात असून, आतापर्यंत २६४ वनधन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.पहिल्या टप्प्यात या योजनेसाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्या माध्यमातून वनधन केंद्रांना प्रशिक्षण देण्यात आले. या केंद्रातील सदस्य असलेल्या आदिवासींनी जंगलात फिरून गोळा केलेले गौण वनउपज खरेदी केले जाते. या केंद्रांना डिजिटायझेशनसाठी प्रत्येकी १५ हजार रुपये निधी देण्यात येणार असून, त्यापैकी अर्धे पैसे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर वनधन केंद्र कार्यान्वित करण्यासाठी ट्रायफूडच्या सूचनांनुसार ६ कोटी ४८ लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यामुळे वनधन केंद्रांवर काम करणाऱ्या  गोरगरीब आदिवासींना मोठा दिलासा मिळाला आहे.वनधन केंद्रांचा वापरवनधन केंद्रांचे ट्रायफूड केंद्र सुरू करण्याचे आदिवासी विकास महामंडळाचे प्रयत्न असून, लॉकडाऊन उठल्यानंतर त्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. गडचिरोली येथे मोहफूल, नंदुरबार येथे आमचूर व मोहफूल, जव्हार येथे गुळवेल यांचे ट्रायफूड केंद्र तयार करण्याचे विचाराधीन असून त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र