आदिवासी सेनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST2021-07-16T04:12:15+5:302021-07-16T04:12:15+5:30
शासनाने गरिबांना परवडणारा रेल्वे प्रवास बंद करून त्यांचा रोजगार हिरावला आहे. सरकारला जाग आणण्यासाठी ही लक्षवेधी निदर्शने केल्याचे ...

आदिवासी सेनेची निदर्शने
शासनाने गरिबांना परवडणारा रेल्वे प्रवास बंद करून त्यांचा रोजगार हिरावला आहे. सरकारला जाग आणण्यासाठी ही लक्षवेधी निदर्शने केल्याचे अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांनी सांगितले. येत्या महिन्याभरात नामांतर व प्रलंबित मागण्या मान्य झाल्या नाही तर मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल आणि शिवसेना भवनासमोर शासनाविरोधात काळे झेंडे दाखवून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी ॲड. रोहित उगले, अनुसया आगीवले, मंगाबाई आगीवले, संगीता म्हसणे, मनीषा घुले, सोमनाथ आगीवले, बुधाजी आगीवले, मंगला पवार, सुरेश पवार, सुमन लंगडे, संकेत निकाळे आदी उपस्थित होते.
फोटो- १५ आदिवासी सेना
इगतपुरी रेल्वेस्थानक प्रवेशद्वारासमोर अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने निदर्शने करून रेल्वे प्रबंधक सुहास मनियार यांना निवेदन देताना दि. ना. उघाडे यांच्यासह पदाधिकारी.
150721\15nsk_34_15072021_13.jpg
फोटो- १५ आदिवासी सेना इगतपुरी रेल्वे स्थानक प्रवेशद्वारासमोर अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने निदर्शने करून रेल्वे प्रबंधक सुहास मनियार यांना निवेदन देतांना दि. ना. उघाडे यांचेसह पदाधिकारी.