लहाडेंच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी होणार सुनावणी

By Admin | Updated: April 16, 2017 01:19 IST2017-04-16T01:19:29+5:302017-04-16T01:19:44+5:30

लहाडेंच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी होणार सुनावणी

The trial will be held on Monday for the anticipatory bail | लहाडेंच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी होणार सुनावणी

लहाडेंच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी होणार सुनावणी

नाशिक : बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील संशयित व सरकारी सेवेत असताना विनानोंदणी खासगी रुग्णालय सुरू करणे, नोंदणी कागदपत्रांमध्ये फेरफार व गर्भपाताची औषधे बाळगल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी (दि़१७) सुनावणी होणार आहे़
जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात डॉ़ लहाडे यांना निलंबित करण्यात आले आहे़ तसेच म्हसरू ळ पोलीस ठाण्यात सरकारी सेवेत असताना खासगी रुग्णालय, नोंदणी कागदपत्रात फेरफार तसेच गर्भपाताची औषधे यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी लहाडे यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ सी़ शर्मा यांच्या न्यायालयात जामीन अर्ज केला असून, त्यावर शनिवारी (दि़१५) वकिलांचा युक्तिवाद होणार होता़ मात्र, काही कारणास्तव हा युक्तिवाद सोमवारी करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत़
जिल्हा रुग्णालयातील गर्भपात प्रकरणात नाशिक महापालिकेचे वैद्यकीय पथक डॉ़ लहाडे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करणार आहे़ शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हे पथक सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजर झाले व त्यांनी लहाडेंविरोधात गर्भपात कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी तक्रार दिली असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ दरम्यान, डॉ़ लहाडे यांच्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातच गर्भलिंग निदान तसेच अवैध गर्भपात वाढीव कलम टाकायचे की स्वतंत्र गुन्हा दाखल करायचा यावर पोलीस अधिकारी कायदेतज्ज्ञांकडून माहिती घेत
होते़ (प्रतिनिधी)

Web Title: The trial will be held on Monday for the anticipatory bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.