प्रचलित पद्धतीने लिलाव करा

By Admin | Updated: July 26, 2016 22:24 IST2016-07-26T22:24:21+5:302016-07-26T22:24:21+5:30

सटाणा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अडविला राज्यमार्ग

Trend Auction | प्रचलित पद्धतीने लिलाव करा

प्रचलित पद्धतीने लिलाव करा

सटाणा : कांदा व्यापाऱ्यांनी गोणी पद्धतीने कांदा लिलाव सुरू करण्याची भूमिका घेतल्याने बागलाणमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या विरोधात मंगळवारी अचानक विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग रोखून धरत आपला संताप व्यक्त केला. येत्या ४८ तासात गोणी पद्धतीचा निर्णय मागे घेऊन प्रचलित पद्धतीने कांदा लिलाव सुरू न केल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
व्यापारी व बाजार समिती यंत्रणेची भूमिका शेतकऱ्यांना वेठीस धरणारी असल्याने आज संतप्त झालेल्या शंभर ते दीडशे शेतकऱ्यांनी अचानक शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ ठिय्या देऊन विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग तब्बल एक तास रोखून धरला. यामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली होती. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्र्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. एक तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनात अरविंद सोनवणे, पांडुरंग सोनवणे, बिंदूशेठ शर्मा, सुभाष पाटील, देवीदास अहिरे, राकेश बाळासाहेब सोनवणे यांनी मनोगतातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी कांदा उत्पादक शेतकरी किरण रौंदळ, राजेंद्र रौंदळ, नीलेश सोनवणे, बबलू रौंदळ, तुकाराम बोरसे, कचरू तिवारी, यतीश रौंदळ, सुरेश सोनवणे, तुकाराम बोरसे, दिलीप अहिरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. रास्ता रोको आंदोलनात जनार्दन सोनवणे, आनंद सोनवणे, अभिमन सोनवणे, जिभाऊ बच्छाव, ओंकार मोगरे, बाळासाहेब सोनवणे, दौलत अहिरे, हिरामण गांगुर्डे, लक्ष्मण अहिरे, माधव सोनवणे, श्रीराम सोनवणे, हेमंत खैरनार, सचिन सोनवणे, सुरेश नंदाळे, श्रावण फटांगडे, कल्पेश ठोके, भिका गोसावी, व्यंकट सोनवणे, पंडित खैरनार, दिनेश देवरे, योगेश सूर्यवंशी, सचिन अहिरे, आधार जाधव, अमृत जाधव, नारायण सोनवणे, हरी खैरनार आदिंसह कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Trend Auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.