वृक्षांच्या संगोपनाचा घेतला वसा

By Admin | Updated: August 20, 2016 00:36 IST2016-08-20T00:21:35+5:302016-08-20T00:36:29+5:30

रक्षाबंधन : भालूर येथील जनता विद्यालयात झाडांना बांधल्या राख्या

Trees grown in the fats | वृक्षांच्या संगोपनाचा घेतला वसा

वृक्षांच्या संगोपनाचा घेतला वसा

 मनमाड : येथील मानवता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने घरापासून दूर राहणाऱ्या व सण-समारंभ साजरा करू न शकणाऱ्या ट्रकचालक, पोलीस, रिक्षाचालकांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे व पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. मनमाड बस स्टॅँड परिसरात पुणे-इंदूर महामार्गावरून जाणाऱ्या अनेक ट्रकचालकांना व
रिक्षाचालकांना राख्या बांधण्यात आल्या.
संस्थेचे संंस्थापक अध्यक्ष दिलीप नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात संंस्थेच्या महिला पदाधिकारी शोभाताई नरवडे, विद्या अहिरे, भाग्यश्री मोरे, अश्विनी कटारे, प्रतिमा शिरसाठ, शालिनी शिंदे, भारती पवार, दीपाली शिंदे, भारती अहिरे, कविता केदारे, आम्रपाली निकम आदि सदस्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी कैलास अहिरे, दिनकर धिवर, सुधाकर मोरे, रूपेश अहिरे आदि उपस्थित होते.
लायनेस क्लबच्या वतीने रक्षाबंधन
येथील लायनेस क्लबच्या वतीने सार्वजनिक स्वरूपात रक्षाबंधन साजरे करण्यात आले.पोलीस कर्मचारी तसेच घरापासून दूर असलेल्या वाहनचालकांना राख्या बांधण्यात आल्या. यावेळी साधना पाटील, पुष्पाताई मतकर, संगीता हाके, पुष्पलता मोरे, शकुंतला
बागुल, स्नेहल भागवत, श्रीमती कुलकर्णी आदि महिला सदस्य उपस्थित होत्या.
भालूर येथील मविप्र संचलित जनता विद्यालयात विद्यार्थिनींनी झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. वृक्षांच्या संगोपनाचा संकल्प यावेळी विद्यार्थिनींनी केला.
शिक्षक पी. एम. शिंदे व बोरगुडे यांनी पौराणिक व आधुनिक विज्ञान याविषयी माहिती दिली. या प्रसंगी प्राचार्य बी. बी. गिते, शिक्षक आहेर, कदम, पी. एम. शिंदे, कवडे, शिनगारे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
बालमुक्तांगणमध्ये रक्षाबंधन साजरे
चांदवड : येथील पूर्वप्राथमिक बालमुक्तांगण विद्यामंदिर येथे रक्षाबंधन
कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी वृक्षांना राख्या बांधून वृक्षसंवर्धनाचा सल्ला देण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना भेटवस्तू दिल्या. याप्रसंगी मिठाईचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक श्रीमती
नवले, मिसगर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. (वार्ताहर)

Web Title: Trees grown in the fats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.