सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागातील ग्रामपंचायत टाकेद बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.सॅमसोनाइट सीएसआर फंडातून फणस, चिक्कू, आंबा, केशर आंबा, आवळा, बदाम अशा पाच प्रकारचे टाकेद येथील जिल्हा परिषद शाळेत जवळपास तीस चाळीस झाडे देण्यात आली होती. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ आढाव यांनी टाकेद ग्रामपंचायतच्या सरपंच ताराबाई बांबळे, माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे, राम शिंदे, पोलीसपाटील प्रभाकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य लहामटे, विक्रम भांगे आदींच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकेद बु, शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी केंद्रप्रमुख कैलास भवारी, मुख्याध्यापक नवनाथ आढाव, शिक्षक रामदास लोहकरे, जगन्नाथ गांगड, श्रीमती एस. नवले, कल्पना गरुड, श्रीमती रत्नाबाई लोभी, लताबाई परदेशी आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या टाकेदत शाळेत वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 00:41 IST
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागातील ग्रामपंचायत टाकेद बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या टाकेदत शाळेत वृक्षारोपण
ठळक मुद्देग्रामपंचायत सदस्य लहामटे, विक्रम भांगे आदींच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकेद बु, शालेय आवारात वृक्षारोपण