शिक्षक भारती महिला आघाडीतर्फे वटवृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:19+5:302021-06-26T04:11:19+5:30
येथील प्राथमिक शिक्षक भारतीच्या महिला आघाडीने वटपौर्णिमेला तहसील कार्यालयाच्या प्रांगणात वडाच्या वृक्षांचे रोपण करून संगोपनाचा निर्धार केला. यावेळी तहसीलदार ...

शिक्षक भारती महिला आघाडीतर्फे वटवृक्षारोपण
येथील प्राथमिक शिक्षक भारतीच्या महिला आघाडीने वटपौर्णिमेला तहसील कार्यालयाच्या प्रांगणात वडाच्या वृक्षांचे रोपण करून संगोपनाचा निर्धार केला. यावेळी तहसीलदार राजपूत यांच्या हस्ते वटवृक्षांचे रोपण करण्यात आले. त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी राज्य सरचिटणीस भरत शेलार, विभागीय अध्यक्ष राजेंद्र दिघे, जिल्हाध्यक्ष प्रकल्प पाटील, विभागीय संपर्कप्रमुख सतीश मांडवडे, जिल्हा कार्याध्यक्ष वाल्मीक घरटे, पुरुषोत्तम पाटील, सहसचिव सुनील ठाकरे, नीलेश नहिरे, भाऊसाहेब कापडणीस, अभिजीत देसले, विशाल धिवरे उपस्थित होते. सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षात अव्वल असणाऱ्या वडाला पुरातन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे अध्यक्ष नूतन चौधरी यांनी सांगितले.
संरक्षक जाळ्या देणारे निवृत्त केंद्रप्रमुख साहेबराव बच्छाव, सुनील ठाकरे, मोतीलाल भामरे यांचा तहसीलदार राजपूत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष
सीमा पगार, सुनीता धाडीवाल, शीतल बच्छाव, वंदना पाटील, संगीता पाटील, सरला चव्हाण, छाया देसले, सुवर्णा सोळंकी, लता सूर्यवंशी, आशा सोनवणे, शीला गोसावी आदींनी उपक्रमासाठी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन मनिषा सावळे यांनी तर नीलिमा देसले यांनी आभार मानले.