त्र्यंबकेश्वर देवस्थानातर्फे बिल्वतीर्थ परिसरात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 20:47 IST2021-09-26T20:46:33+5:302021-09-26T20:47:00+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील नीलपर्वताच्या उत्तरेकडील बिल्वतीर्थ हा तलाव व संपूर्ण नीलपर्वताच्या उत्तर बाजूकडील जागा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मालकीची असून या जागेत ट्रस्टच्या वतीने रविवारी (दि. २६) वृक्षारोपण करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर देवस्थानातर्फे बिल्वतीर्थ परिसरात वृक्षारोपण
ठळक मुद्दे सुमारे ११०० रोपांची लागवड करण्यात आली.
त्र्यंबकेश्वर : येथील नीलपर्वताच्या उत्तरेकडील बिल्वतीर्थ हा तलाव व संपूर्ण नीलपर्वताच्या उत्तर बाजूकडील जागा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मालकीची असून या जागेत ट्रस्टच्या वतीने रविवारी (दि. २६) वृक्षारोपण करण्यात आले.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी, विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल, संतोष कदम, भूषण अडसरे, तृप्ती धारणे यांच्या हस्ते देशी प्रजातींच्या वृक्षांना प्राधान्य देऊन वड, बेल, शमी, कदंब, करंज, हिरडा, सोनचाफा, कडुलिंब, चिंच, जांभूळ, आवळा आदी वृक्षांच्या सुमारे ११०० रोपांची लागवड करण्यात आली.