शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नामपूरच्या वैकुंठधामात लोकसहभागातून वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 16:08 IST

शुभवर्तमान : ग्रामस्थांनी उचलली संवर्धनाची जबाबदारी

ठळक मुद्देवैकुंठधाम परिसरात सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने १११ वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे सात फूट उंचीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले

नामपूर : शासनासह विविध संस्थांकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात परंतु, त्यात अपवाद वगळता बव्हंशी फोटोसेशनपुरताच पर्यावरण संवर्धनाचा आव आणला जातो. नामपूरकरांनी मात्र लोकसहभागातून वैकुंठधाम स्मशानभूमीत १११ देशी वृक्षांची लागवड करत त्यांच्या संवर्धनाचीही जबाबदारी उचलत एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे.नामपूरमध्ये वैकुंठधाम सुधार समिती कार्यरत आहे. या समितीच्या सदस्यांनी वैकुंठधामात वृक्षारोपणासाठी सोशलमिडियावर आवाहन केले. वृक्ष व संरक्षक जाळीसह विशिष्ट रक्कमही जाहीर केली आणि अवघ्या १५ मिनिटात १११ वृक्षांचे २४ दाते तयार झालेत. या प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आणि वैकुंठधाम परिसरात सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने १११ वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे सात फूट उंचीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यात बकुळ, सप्तपर्णी,निंब,वड, कदंब, पिंपळ, कोरडीया इत्यादी जातीच्या वृक्षांचा समावेश आहे. सार्वजनिक निधी गोळा करून झाडे तसेच झाडांना संरक्षणासाठी लागणाऱ्या जाळ्या तसेच संगोपनासाठी पाणी आदी गोष्टींचे नियोजन करण्यात आले. या देशी वृक्षांना नामपूरचे उपक्र मशिल शेतकरी विकीराज सावंत हे स्वखर्चाने पाणी उपलब्ध करून देणार आहेत. तर माऊली सावंत, डी.एल.नेर. विठ्ठल मगजी ,महेश सावंत, माधवराव सावंत आणि भाऊसाहेब सावंत यांनी सप्ताहातून एकदा वृक्षांना पाणी टाकण्याची जबाबदारी घेतली आहे. या उपक्रमाबरोबरच आदर्श चौकातील बहुउद्देशिय आदर्श मंडळानेही चौकात विविध झाडे लावल्याची माहिती मंडळाचे प्रमुख संतोष सावंत यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक