The tree-cutters fled; Environmentalists pay homage to the mango tree | झाडाची कत्तल करणारे पळाले; आम्रवृक्षाला पर्यावरण प्रेमींनी वाहीली श्रद्धांजली

झाडाची कत्तल करणारे पळाले; आम्रवृक्षाला पर्यावरण प्रेमींनी वाहीली श्रद्धांजली

नाशिक- कोणत्याही प्रकारे रस्त्यात अडथळा नाही की कुणाला फांद्याचा त्रास नाही. सावली देण्याचे अखंड व्रत अंगीकारणाऱ्या त्या आम्रवृक्षावर भल्या सकाळी कोणी तरी कटर चालवले आणि चांगली फळे देणारा हा आम्रवृक्ष कोसळला. कोणा पर्यावरण प्रेमींच्या जागृकतेमुळे झाड तेथेच टाकून कत्तल करणारे पळाले. ते सीसीटीव्हीत कैदही झाले. परंतु ते सापडले नाही की कारवाई झाली
नाही. त्यामुळे हळललेल्या पर्यावरण प्रेमींनी याठिकाणी मेणबत्त्या पेटवून अनोखी श्रध्दांजली अर्पण केली.  

एक वृक्ष गेला तर हजारेा वृक्ष लावून हरीत नाशिक कायम ठेवू या अशी मागणी यावेळी झालेल्या शाेक सभेत गेली. नाशिक शहरात जवळ पास ४७ लाख वृक्ष असल्याची नोंद आहे. मात्र, अनेक ठिकाणी बेकायदेशीर वृक्षतेाड होत आहे. गेल्य आठवड्यात कारण नसताना अशाच प्रकारे डिसुझा कॉलनीत एक वृक्ष भल्य सकाळी अचानक कटर लावून तेाडण्यात आला. काही जागृक नागरीकांनी हटकल्यानंतर संबंधीत पसार झाले. परंतु ते सीसीटीव्हीत कैद झाले. परंतु यानंतरही महापालिकेने पोलीसात तक्रार करण्यापलिकडे काही करीत नाही त्यामुळे हे अभिनव प्रकारचे आंदोलन करण्यात आले.

Web Title: The tree-cutters fled; Environmentalists pay homage to the mango tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.