येवला येथे झाड कोसळून एक जखमी
By Admin | Updated: October 8, 2016 00:45 IST2016-10-08T00:32:35+5:302016-10-08T00:45:53+5:30
येवला येथे झाड कोसळून एक जखमी

येवला येथे झाड कोसळून एक जखमी
येवला : येथील रेल्वे स्टेशन परिसरात सुमारे १०० वर्षांपूर्वीचे जीर्ण झालेले कडुनिंबाचे झाड एका घरावर कोसळून एक जण जखमी झाला व बाजूला उभी असलेल्या मोटारसायकलचे देखील नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
शनिवारी दुपारी एक वाजता अचानकपणे हे कडुनिंबाचे झाड घरावर कोसळले. या घरात इस्त्री करत असलेले बाबुलाल सांडूभाई पठाण (६५) यांच्या डोक्यावर पडलेल्या छताचा आघात झाला आणि त्यात ते जखमी झाले. दरम्यान, घराच्या बाहेर प्रमोद जगदाळे यांची पल्सर मोटारसायकल (क्र. एमएच २० सीएक्स ३६८९) या गाडीवरदेखील झाडाची एक फांदी कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, तलाठी विठ्ठल शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नियमानुसार या संबंधाने कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जखमी बाबुलाल पठाण यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)