एकाच दिवशी ४०० रुग्णांनी घेतले उपचार
By Admin | Updated: August 9, 2015 23:25 IST2015-08-09T23:25:29+5:302015-08-09T23:25:59+5:30
एकाच दिवशी ४०० रुग्णांनी घेतले उपचार

एकाच दिवशी ४०० रुग्णांनी घेतले उपचार
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू करण्यात आलेल्या साधुग्राममधील रुग्णालयात एकाच दिवशी ४३७ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण सर्दी, खोकला, तापाचे आहेत.
सिंहस्थ कालावधीत रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागामार्फत साधुग्राममध्ये पाच ठिकाणी रुग्णालये उभारण्यात आली आहे. दररोज याठिकाणी रुग्णांची तपासणी केली जात आहे. साधुग्रामधील लक्ष्मीनारायण मंदिराजवळील रुग्णालयात ११६, सेक्टर- २ सी मध्ये ११०, तपोवन १०६, सेक्टर-२ ए ७१, सेक्टर-१ बी मध्ये १३, तर रामकुंडाजवळील रुग्णालयात २२ रुग्णांनी उपचार घेतले. वातावरणातील बदलांमुळे साधू-महंतांसह आखाड्यात काम करणारे कर्मचारी रुग्णालयात उपचार घेताना दिसून येत आहे. सिंहस्थासाठी ४०० वैद्यकीय अधिकारी कार्यरत असणार आहेत. तसेच आरोग्य विभागाकडून फिरते पथकही महंत व भाविकांना तातडीने उपचार मिळावे यासाठी कार्यन्वित करण्यात येणार आहे. तसेच या काळात सेवाभावी संस्था, वैद्यकीय महाविद्यालयाची मदत घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)