व्यसनांच्या आहारी गेलेल्या मुलांवर व्हावे उपचार
By Admin | Updated: July 19, 2014 21:18 IST2014-07-18T23:57:57+5:302014-07-19T21:18:36+5:30
चाइल्डलाइन : सल्लागार मंडळाच्या बैठकीत ठराव

व्यसनांच्या आहारी गेलेल्या मुलांवर व्हावे उपचार
नाशिक : सिग्नलवरील मुले, मतिमंद मुलांसाठी तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय करावी, व्यसनांच्या आहारी गेलेल्या बालकांवर सरकारी दवाखान्यात उपचार करून त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, असे ठराव चाइल्डलाइन सल्लागार मंडळाच्या बैठकीत घेण्यात आले़
निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली़ यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले़ रस्त्यावरील मुले, निराधार मुले, निराश्रित, बालमजूर, भरकटलेली मुले, लैंगिक शोषणाला बळी पडलेली मुले, भिकारी मुले यांच्याबाबत चर्चा करण्यात आली़
यावेळी सहायक पोलीस अधीक्षक पंकज डहाणे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी योगिता पाठक, बालकल्याण समिती अध्यक्ष वैशाली साळी, महापालिका प्रशासन अधिकारी किरण कुंवर, रेल्वे सुरक्षा दलाचे एल़ के़ सिंग, सामाजिक संस्थेचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजू शिरसाठ, चाइल्डलाइनचे संचालक विलास देशमुख, महेंद्र विंचूरकर, समन्वयक प्रणिता तपकिरे, प्रवीण अहेर आदि उपस्थित होते़