पिंपळगाव वाखारीत १७ रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 19:11 IST2021-04-14T19:11:16+5:302021-04-14T19:11:45+5:30
पिंपळगाव वाखारी : येथील परिसरात आत्तापर्यंत ५७ जणांना कोरोनाची लागण झाली असून तीन पुरुष व तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. ३० जण कोरोनातून बरे झाले असून १७ जण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

पिंपळगाव वाखारीत १७ रुग्णांवर उपचार
ठळक मुद्देगावातील सुमारे ३५० नागरिकांनी कोविड लस घेतली
पिंपळगाव वाखारी : येथील परिसरात आत्तापर्यंत ५७ जणांना कोरोनाची लागण झाली असून तीन पुरुष व तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. ३० जण कोरोनातून बरे झाले असून १७ जण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने दहा दिवसांचा लॉकडाउन केल्याने रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. मात्र गृह विलगीकरणातील काही रुग्ण नियम पाळत नसल्याची तक्रार होत असल्याने प्रशासनाने त्यांच्याबाबत कठोर भूमिका घेण्याची गरज निर्माण आहे. आत्तापर्यंत गावातील सुमारे ३५० नागरिकांनी कोविड लस घेतली आहे.