Travelers arriving at Igatpuri will leave for Mumbai again | इगतपुरी येथे आलेल्या प्रवाशांची पुन्हा मुंबईला रवानगी

लॉकडाऊनच्या भीतीने मुंबई, ठाणेसह अन्य परिसरातून नाशिककडे निघालेल्या नागरिकांना रेल्वेस्थानकात रोखण्यात आले.

ठळक मुद्दे५० प्रवाशांना घोटी टोल नाक्याजवळ अडविण्यात आले.

इगतपुरी : लॉकडाउन व उपासमारीच्या भीतीने मुंबई, ठाणेसह अन्य परिसरातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे महामार्गाने निघालेले सुमारे दोनशे नागरिक व मुंबईकडून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेत बेकायदेशीररीत्या शिरलेल्या सुमारे १५० ते २०० प्रवाशांना इगतपुरी येथे रोखण्यात आले. त्यांची जिल्हा प्रशासनाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास पुन्हा मुंबईकडे रवानगी केली आहे.
दरम्यान, महामार्गाकडून आलेल्या दोनशेंपैकी दीडशे प्रवाशांना रेल्वेने माघारी पाठविले असून, पुढे निघालेल्या ५० प्रवाशांना घोटी टोल नाक्याजवळ अडविण्यात आले. एका ट्रकमध्ये बसवून त्यांना मुंबईला पाठविण्यात आले.

Web Title: Travelers arriving at Igatpuri will leave for Mumbai again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.