शहरं
Join us  
Trending Stories
1
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
2
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
3
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
4
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
5
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
6
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
7
आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार?
8
सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
9
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
10
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
11
१० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या
12
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
13
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
14
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
15
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
16
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
17
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
18
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
19
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
20
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिस्ती बांधवांनी काढली शांती यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:48 IST

: नाशिकरोड येथील संत फिलीप चर्चतर्फे रविवारी (दि. २५) शांती पदयात्रा काढण्यात आली. गुड फ्रायडेच्या दिवशी येशुला वधस्तंभावर खिळे ठोकून मारण्यात आले.

नाशिकरोड : नाशिकरोड येथील संत फिलीप चर्चतर्फे रविवारी (दि. २५) शांती पदयात्रा काढण्यात आली. गुड फ्रायडेच्या दिवशी येशुला वधस्तंभावर खिळे ठोकून मारण्यात आले. त्याआधी शांतीदूत येशूने पाम वृक्षाची फांदी हातात घेऊन ‘होसान्ना-होसान्ना’ म्हणजेच तुम्हाला शांती असो, असे म्हणत येरूशलेम नगरीत प्रवेश केला. तो दिवस म्हणजे पाम संडे म्हणून ओळखला जातो. बिशप लुर्ड्स डॅनियल यांनी भाविकांना यावेळी मार्गदर्शन केले. जगाला शांतता, मैत्री आणि प्रेमाचा संदेश मिळावा म्हणून काढलेल्या शांतीयात्रेत शेकडो ख्रिती बांधव सहभागी झाले होते. सायंकाळी सेंट झेवियर शाळेतील बाल येशू देवालयातून प्रारंभ झाला. देवालयाचे प्रमुख फादर ट्रिव्हर मिरांडा, फादर राबर्ट पेन, फादर संतांन राड्रिक्स, फादर रवि त्रिभुवन, रेव्ह. प्रवीण घुगे, चर्चचे सचिव सायमन भंजारे, रूपेश निकाळजे, फ्रान्सिस वाघमारे, प्रदीप जाधव, सुभाष श्रीसुंदर, अतुल घोरपडे, बेंजामिन निकाळजे, राहुल साठे, संजय अहिरे, सुहास गंगोदक, सचिन साबळे, दिनेश दास, मंदा घुले उपस्थितीत होते. यात्रेत सुमारे भाविक हातात पाम वृक्षाची डहाळी घेऊन सहभागी झाले होते. शांती यात्रेत बांधव पांढरे शुभ्र वस्त्र घालून हातात पांढरे झेंडे, पाम वृक्षाची डहाळी घेऊन सहभागी झाले होते. ‘होसान्ना-होसान्ना’ प्रभूच्या नावाने गौरव गिते गात होते. शांती यात्रा मुक्तिधाम रोडवरील चर्चपासून सुरू होवून बिटको, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मिना बाजार आदी परिसरातून काढण्यात आली.पदयात्रा जेलरोडच्या संत आन्ना कॅथिड्रलमध्ये आली. विश्वशांतीसाठी प्रार्थना झाली. बिशप लुर्ड्स डॅनियल म्हणाले की, जगात शांतता, समता, बंधूता यावी यासाठी येशूने जीवन व्यतित केले. येशू लोकांच्या हृदयात येतो. त्याचे विश्वासाने स्वागत करा, येशूला संपूर्ण मानवजातीचा उद्धार करायचा होता. त्याला लोकांना सत्तेच्या नव्हे तर पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे होते. त्यासाठी त्याने योगदान दिले. येशू परमेश्वराचा मार्ग दाखवतो. हा मार्ग खडतर असला तरी त्यातूनच शांती मिळते.

टॅग्स :Nashikनाशिक