शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पंचवटीत सापळा : कर्नाटकचे १२ टन आले अन‌् कोल्हापूरची १५ लाखांची मिर्ची लांबविणारे दोघे लबाड पोलिसांच्या जाळ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 16:10 IST

मिर्चीचे पोती दुसऱ्या टेम्पोमध्ये भरुन बनावट धनादेश लिहून देऊन देता पोबारा केला होता. याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरुन इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचीही उकल झाली

ठळक मुद्देबनावट धनादेश अथवा किरकोळ रक्कम देत करत होते पोबाराशेतमाल घेऊन फरार होणारे दोघे गजाआडसहा लाखांचा मुद्देमाल जप्तबनावट धनादेशाद्वारे मिर्ची लुटल्याचीही कबुली

नाशिक : कर्नाटकच्या एका शेतमाल व्यापाऱ्याला जास्त बाजारभाव मिळवून देण्याचे आमीष दाखवून १२ टन आले परस्पर ट्रकमधून अन्य वाहनांमध्ये भरुन केवळ ट्रकभाडे आणि दैनंदिन खर्चाची रक्कम देत पोबारा करणाऱ्या तोतया शेतमाल व्यापाऱ्यांना अंबड पोलिसांनी पंचवटी येथील मार्केट यार्ड परिसरात सापळा रचून शिताफीने बेड्या ठोकल्या.

कर्नाटक येथील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यापारी तौफिक फय्याज अहमद अन्सर (४०,रा. चिखमंगलुर, कर्नाटक) यांच्याकडे १२ टन आले (अद्रक) खरेदी करावयाचे आहे, असे सांगून व्यवहार केला. तौफिक हे ट्रकमध्ये सुमारे २५० पोती भरुन आले घेऊन नाशकात दाखल झाले असता शनिवारी (दि.१२) मोसिन व त्याच्या मित्रांनी मिळून संगनमताने त्यांच्या ट्रकमधून आल्याच्या सर्व पोती अन्य वाहनांमध्ये परस्पर भरुन घेत पोबारा केल्याची घटना घडली होती. तौफिक यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अंबड पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला. मिळालेल्या माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरिक्षक कुमार चौधरी, श्रीकांत निंबाळकर यांनी स्वतंत्र पथक तयार केले. पथकाने वडाळागावातील संशयिताच्या पत्त्यावर धडक दिली; मात्र पत्ता बनावट असल्याचे पुढे आले.संशयितांनी ज्या मालवाहू वाहनातून आल्याची पोती लांबविली. त्या वाहनाच्या आरटीओ नोंदणी क्रमांकावरुन पोलिसांनी पुढील तपासाला दिशा दिली. यावरुन चोरीचा आले खरेदी करणारा व्यापारी पोलिसांच्या हाती लागला. त्यास विश्वासात घेत संशयितांकडून काही रक्कम घ्यावयाची असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले....असे अडकले जाळ्यातआले खरेदी करणाऱ्या दुसऱ्या व्यापाऱ्याला उरलेली रक्कम परत देण्यासाठी पंचवटी येथील मार्केट यार्डात संशयित मोहसीन अकील शेख (२९,रा.शिवाजीनगर, सातपुर), व अबरार महेबुब बागवान (२७,रा. बागवानपुरा, जुने नाशिक) हे दोघे कारमधून आले. पथकाला खात्री पटताच तपासी अधिकारी राकेश शेवाळे, रवी पानसरे, चंद्रकांत गवळी, हेमंत आहेर आदीनी शिताफीने या दोघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्या ताब्यातुन दोन मोटारी व दोन लाख २० हजार रुपयांची रोकड असा सुमारे ६ लाख वीस हजार रुपयांचा मुद्येमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAgriculture Sectorशेती क्षेत्रArrestअटक