जनावरांच्या मांसाची वाहतूक; भरवीरला दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:36+5:302021-09-26T04:15:36+5:30
चांदवड : तालुक्यातील भरवीर शिवारात जनावरांच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून पिकअपसह आठ लाख ...

जनावरांच्या मांसाची वाहतूक; भरवीरला दोघे ताब्यात
चांदवड : तालुक्यातील भरवीर शिवारात जनावरांच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून पिकअपसह आठ लाख ७३ हजार दोनशे रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. मुंबई- आग्रा रोडवर नाशिकच्या बाजूकडील लेनवर शुक्रवार, दि. २४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सफेद रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअपमध्ये (क्र. एमएच ४१ एयू ४१३५) २६४५ किलो वजनाचे (किंमत रुपये ४ लाख २३ हजार दोनशे रुपये) जनावरांचे बेकायदेशीर कत्तल केलेले मांस भरलेले होते. कुठल्याही प्रकारचा गोमांस वाहतुकीचा परवाना नसताना बेकायदेशीररीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती परिसरातील काही तरुणांना समजताच त्यांनी या सफेद रंगाच्या पिकअपला पकडले. त्यातील सिकंदर शेख फयासुद्दीन शेख (३०, रा. चाळीसगाव) व शाहब अहमद शफीक अहमद (३५, रा. मालेगाव) या दोघांना साडेचार लाख रुपयांची पिकअपसह आठ लाख ७३ हजार दोनशे रुपयांचा मालसह पोलिसांच्या हवाली केले. चांदवड पोलिसांनी गोवंश सुधारणा कलम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये पोलीस विक्रम बाबूराव बस्ते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला व दोघांना पिकअप व गोमांससह ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव अधिक तपास करीत आहेत.