परिवहन उपायुक्त : वाहन तपासणी वेग कमी; आजपासून विशेष मोहीम अधिकाºयांची कानउघडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:06 IST2017-09-17T23:53:25+5:302017-09-18T00:06:26+5:30
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या निर्देशांचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पालन करीत नसल्याचे तसेच त्यांचा वेग कमी असल्याचे आढळून आल्याने परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन विभागांची कानउघडणी करून त्यांना विशेष वाहन तपासणी मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत़ या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवार (दि़१८) ते शुक्रवार (दि़२२) विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली जाणार आहे़

परिवहन उपायुक्त : वाहन तपासणी वेग कमी; आजपासून विशेष मोहीम अधिकाºयांची कानउघडणी
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या निर्देशांचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पालन करीत नसल्याचे तसेच त्यांचा वेग कमी असल्याचे आढळून आल्याने परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन विभागांची कानउघडणी करून त्यांना विशेष वाहन तपासणी मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत़ या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवार (दि़१८) ते शुक्रवार (दि़२२) विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली जाणार आहे़
रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाºया नागरिकांची संख्या लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षा समिती नियुक्त केली असून, सदर समिती अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी परिवहन कार्यालयास निर्देश देत असते़ या समितीने दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्यातील विविध प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाºयांनी आवश्यक त्या तीव्रतेने काम केले नसल्याचे आॅगस्ट २०१७ च्या कार्यवाहीच्या आढाव्यानंतर समोर आले़ त्यामुळे परिवहन उपायुक्त राजेंद्र मदने यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाºयांना पत्र पाठवून १८ ते २२ सप्टेंबर या पाच दिवसांमध्ये विशेष वाहन तपासणी करून त्याचा अहवाल २५ सप्टेंबरपर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत़ परिवहन उपायुक्तांच्या आदेशानुसार नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सोमवार ते शुक्रवार या कालावधीत खासगी संवर्गातील वाहने व वाहनचालक यांची तपासणी केली जाणार आहे़ त्यामध्ये अनुज्ञप्ती वैधता, विमा प्रमाणपत्र तपासणी, हेल्मेट वापर, सीटबेल्ट, वाहन चालविताना मोेबाइलचा
वापर, नियमानुसार नसणाºया नंबर प्लेट, वाहनांवर उत्पादकाने बसविलेले दिवे बदलून प्रखर दिवे बसविणे, मल्टी टोन हॉर्न, दुचाकीवर दोनपेक्षा अधिक प्रवासी या बाबींचा समावेश आहे़ वाहनधारक व चालकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे सोबत ठेवण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी
केले आहे़