जनावरांची वाहतूक; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:55 IST2017-07-18T00:55:07+5:302017-07-18T00:55:22+5:30
जनावरांची वाहतूक; एकास अटक

जनावरांची वाहतूक; एकास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
आझादनगर : शहरातील अंजुम चौक येथे सकाळी ७ वाजेदरम्यान एका इंडिगो कारमधून जनावरांची वाहतूक करताना पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांना मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी ७ वाजता येथील अंजुमन चौक येथे एका टाटा इंडिगो कारमध्ये (क्र. एमएच ०४ डीवाय ४०२६) विनापरवाना बेकायदेशीर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून वाहतूक करताना मिळून आला.