महात्मा फुले, सावित्रीबार्इंचे कार्य सर्वत्र पोहोचवा

By Admin | Updated: October 28, 2015 22:22 IST2015-10-28T22:21:29+5:302015-10-28T22:22:11+5:30

अविनाश ठाकरे : सत्यशोधक चिंतन शिबिर उत्साहात

Transmit the work of Mahatma Phule, Savitribaiyya everywhere | महात्मा फुले, सावित्रीबार्इंचे कार्य सर्वत्र पोहोचवा

महात्मा फुले, सावित्रीबार्इंचे कार्य सर्वत्र पोहोचवा

नाशिक : बहुजन समाजाच्या गुलामगिरीच्या शृंखला तोडून माणसाला माणूस म्हणून जगण्याची उमेद क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच निर्माण झाल्याने त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवा, असे आवाहन अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश ठाकरे यांनी केले.
नाशिक महानगर माळी समाज व क्रांतिकारी विचार ग्रुपच्या वतीने काशीमाळी मंगल कार्यालयात आयोजित सत्यशोधक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले चिंतन शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निवेदिता ताटे, तर प्रमुख अतिथी म्हणून बाजीराव तिडके, राजाराम काठे उपस्थित होते.
१८७३ साली महात्मा फुले यांनी स्थापन केलेला सत्यशोधक
समाज मानवी जीवनाची तत्त्वे व
मूल्ये सांगणारा आहे, असे मत
प्रा. डॉ. कृष्णा मालकर यांनी व्यक्त केले.
शेवटच्या सत्रात अविनाश ठाकरे यांनी विचार मांडले. तर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले ही वैचारिक चळवळ असून, आपण स्वत: त्यांचे विचार समजावून घेऊन समाजापर्यंत पोहचवा, असे मत अध्यक्षीय मनोगतात निवेदिता ताटे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Transmit the work of Mahatma Phule, Savitribaiyya everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.