वडाळागाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी पाच वाजता पोलिसांनी सशस्त्र संचलन केले.परिमंडळ एकमधील इंदिरानगर पोलीस ठाणे, अंबड व सातपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये पोलिसांनी संचलन केले. सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीमधून संचलनाला सुरुवात करण्यात आली. झोपडपट्टीचा संपूर्ण परिसर, खंडोबा चौक, जय मल्हार कॉलनी, रझा चौक, माळी गल्ली, गणेशनगर अदि भागातून पोलिसांनी संचलन करत कायदा सुव्यवस्थेचे सर्वांनी पालन करावे, असा अप्रत्यक्ष संदेश दिला. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे संचलनातून दाखवून दिले. वडाळागावातील संचलनानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या उपस्थितीत सिडको, पवननगर परिसरात संचलन करण्यात आले. त्यानंतर सातपूर पोलीस ठाणे हद्दीतही संचलन पार पडले.
वडाळागावात पोलिसांचे संचलन
By admin | Updated: February 1, 2017 01:01 IST