विभागातील तहसिलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

विभागातील तहसिलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

ठळक मुद्देविभागातील महसूल कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या

नाशिक: विभागातील काही तहसिलदार आणि उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या शासनाने केल्या असून चांदवड प्रांताधिकारी पदी चंद्रशेखर देखमुख यांची तर निफाडच्या तहसीलदार शरद घोरडपे यांची नियुक्ती केली आहे.

राज्यपातळीवर सुरू असलेल्या बदली सत्रात नाशिक विभागातील महसूल कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आलेल्या आहेत. चांदवड प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे यांची अहमदनगर येथे विशेष भू-संपादन अधिकारी म्हणून बदली झाली आहे. पेठ तहसीलदार आणि समृध्दी महामार्गाच्या कामातही हातभार लावलेले कैलास कडलग यांची तळोदा नंदूरबार येथून उपविभागीय अधिकारी फैजपूर येथे बदली झाली आहे. तेथील प्रांत अजित थोरबोले यांची विशेष भूसंपादन अधिकारी अहमदनगर येथे बदली झाली आहे.

तहसीलदारांच्या बदल्यांमध्ये मंदार कुलकर्णी यांची विभागीय महसूल आयुक्तालय येथून नंदूरबारमधील नवापूर तालुका तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे. महेश चौधरी यांची धुळे येथील सहाय्यक पुरवठा अधिकारी पदावरुन विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात बदली झाली आहे. शिंदखेडा तहसीलदार साहेबराव सोनवणे यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. छगन वाघ यांची करमणूक कर तहसीलदार या पदावरुन जळगाव मधील चोपडा तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे.

 

Web Title: Transfers of Tehsildar, Deputy Collector in the department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.