शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:57 IST2021-05-30T23:13:17+5:302021-05-31T00:57:14+5:30
नाशिकरोड : प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द
ठळक मुद्दे ट्रेन क्रमांक ०७२०८ साईनगर शिर्डी-विजयवाडा गाडी २ जून ते १६ जूनपर्यंत रद्द
नाशिकरोड : प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
ट्रेन क्रमांक ०७००२ सिकंदराबाद-साई नगर शिर्डी ही गाडी ४ जून ते १३ जूनपर्यंत आणि ०७००१ साई नगर शिर्डी-सिकंदराबाद ही गाडी ५ जून ते १४ जूनपर्यंत रद्द राहतील. तसेच विजयवाडा-साई नगर शिर्डी गाडी १ जून ते १५ जूनपर्यंत आणि ट्रेन क्रमांक ०७२०८ साईनगर शिर्डी-विजयवाडा गाडी २ जून ते १६ जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे.