मालेगाव तालुक्यातील निवडणूक अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST2020-12-30T04:18:21+5:302020-12-30T04:18:21+5:30
यावेळी नायब तहसीलदार सोमनाथ खैरे यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार राजपूत म्हणाले, मालेगाव तालुक्यातील ...

मालेगाव तालुक्यातील निवडणूक अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग
यावेळी नायब तहसीलदार सोमनाथ खैरे यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार राजपूत म्हणाले, मालेगाव तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीचे कामकाज करताना दाखल उमेदवारी अर्जांची काटेकोर छाननी करावी. यामध्ये उमेदवाराकडे असलेली थकबाकी, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, शैक्षणिक पात्रता, शौचालय, कुटुंब नियोजन, अतिक्रमण आदी बाबींची काटेकोर तपासणी करावी.
ग्रामपंचायतींमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांना नामनिर्देशन अर्जासमवेत समितीकडे जाती दावा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती विहीत मुदतीत सादर करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नामनिर्देशनपत्रासोबत आवश्यक ते सर्व स्वयंघोषणापत्र हे नोटरी किंवा सेतू शिक्का नसेल, तरी चालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.