वाहन परवान्यासाठी प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:24 IST2020-12-03T04:24:11+5:302020-12-03T04:24:11+5:30
नाशिक फर्स्ट संस्थेद्वारे यापूर्वी विनामूल्य घेण्यात येणारे प्रशिक्षण आता कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ऑनलाइन घेण्यात येणार आहे. ...

वाहन परवान्यासाठी प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक
नाशिक फर्स्ट संस्थेद्वारे यापूर्वी विनामूल्य घेण्यात येणारे प्रशिक्षण आता कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ऑनलाइन घेण्यात येणार आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारे प्रशिक्षणवर्ग दर आठवड्याच्या मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान असणार आहे.
या प्रशिक्षणासाठी शिकावू परवानाप्राप्त उमेदवारांनी नाशिक फर्स्ट या संस्थेत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाइन प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नाशिक फर्स्ट संस्थेद्वारे ई-मेल आयडीवर आणि व्हाॅट्सॲप क्रमांकावर प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र पक्के अनुज्ञप्तीसाठी चाचणी देताना चाचणी अधिकारी यांना सादर करणे बंधनकारक असल्याचेही कळविण्यात आले आहे.