शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

By अझहर शेख | Updated: March 18, 2025 14:54 IST

जानेवारी महिन्यापासून महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशक्षिणार्थी पोलीस उपनिरिक्षक म्हणून प्रशिक्षण घेत होते.

नाशिक : बीड जिल्ह्यातील धोंडराई गावातील रहिवासी असलेले प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक सोमेश्वर भानुदास गोरे (३२,रा. खोली क्र-१५५, दक्षिण वसतीगृह, एमपीए) यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या आवारातील वसतीगृहाच्या राहत्या खोलीत सोमवारी (दि.१७) गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जानेवारी महिन्यापासून महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशक्षिणार्थी पोलीस उपनिरिक्षक म्हणून प्रशिक्षण घेत होते. सोमवारी दुपारी ते प्रशिक्षण घेत असलेल्या १५क्रमांकांच्या स्कॉडसह १३, १४ क्रमांकांच्या स्कॉडमधील प्रशिक्षणर्थींची उंटवाडी येथील बाल सुधारगृह भेटीचे आयोजन करण्यात आले होते. पाऊण वाजेच्या सुमारास ही भेट आटोपल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना पोलिस नाईक चंद्रकांत पांडुरंग घेर (३२,रा.नेम.कवायत निर्देशक, एमपीए) यांनी वसतीगृहात सोडले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास स्कॉड फॉलिंग घेण्यात आले. स्कॉड कॉरपरेर भरत नागरे यांनी घेर यांना कळविले की, प्रशिक्षणार्थी गोरे हे फॉलिंगला हजर राहिलेले नाही. त्यानंतर त्यांनी स्कॉड मार्च करून गोरे राहत असलेल्या दक्षिण वसतीगृह खोली क्र-१५५ गाठली.

खिडकीतून आतमध्ये डोकावून बघितले असता त्यांनी गळफास घेतलेला असल्याचे आढळून आले, अशी खबर घेर यांनी गंगापुर पोलिसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच गंगापुर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गोरे यांचा मृतदेह खाली उतरवून पंचनामा करत शवविच्छेदनासाठी सायंकाळी शासकिय जिल्हा रूग्णालयात हलविला. याप्रकरणी गंगापुर पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार किशोर पगार हे करीत आहेत.त्यांच्या पश्चात आई, वडील दोन भावंडं असा परिवार आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस