प्रशिक्षणार्थी परिचारिकेचा मृत्यू
By Admin | Updated: September 23, 2015 22:26 IST2015-09-23T21:49:41+5:302015-09-23T22:26:00+5:30
जिल्हा रुग्णालयात तणाव : चौकशी समिती स्थापन; पालक संतप्त

प्रशिक्षणार्थी परिचारिकेचा मृत्यू
नाशिक : जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालया-तील प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला़ सुप्रिया बाबू माळी (१९) असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती नंदूरबार येथील रहिवासी आहे़ गत तीन दिवसांपासून आजारी असूनही वसतिगृह व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे़ या घटनेची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयात पोहोचून गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता़ दरम्यान या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ़ बी़ डी़ पवार यांनी दिली आहे़