सुकेणे चांदोरी रस्त्यावरील रेल्वेफाटक दोन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 19:53 IST2019-06-04T19:52:56+5:302019-06-04T19:53:53+5:30

कसबे सुकेणे : सुकेणे- चांदोरी रस्त्यावरील मध्यरेल्वेचे ९६ क्र मांकाचे फाटक बुधवारी (दि.५) व गुरु वारी (दि.६) या दोन दिवशी दुरु स्तीच्या कारणास्तव बंद राहणार आहे.

The train from Sukeni Chandoki road is closed for two days | सुकेणे चांदोरी रस्त्यावरील रेल्वेफाटक दोन दिवस बंद

सुकेणे चांदोरी रस्त्यावरील रेल्वेफाटक दोन दिवस बंद

ठळक मुद्देकसबे सुकेणे : दुरु स्तीच्या कारणास्तव वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली

कसबे सुकेणे : सुकेणे- चांदोरी रस्त्यावरील मध्यरेल्वेचे ९६ क्र मांकाचे फाटक बुधवारी (दि.५) व गुरु वारी (दि.६) या दोन दिवशी दुरु स्तीच्या कारणास्तव बंद राहणार आहे. या दोन दिवसांरीता सदर यामार्गावरील वाहतूक पिंपळस रस्ता व इतर पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली असल्याची माहिती नाशिकरोड रेल्वेप्रशासनाने दिली.
मौजे सुकेणे शिवारातील चांदोरी रस्त्यावरील ९६ क्र मांकाच्या रेल्वेफाटकावर अप आणि डाऊनच्या मार्गावर दुरु स्ती करावयाची असल्याने सदरचे फाटक बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी दोन दिवस अन्य पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन नाशिकरोड येथील सिव्हिल सेक्शन इंजिनियर यांनी पत्रकान्वये केले आहे.

Web Title: The train from Sukeni Chandoki road is closed for two days