शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुक पोलिसाने सुशिक्षित बेरोजगाराला घातला १८ लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 17:18 IST

संशयित आरोपी गोसावी व म्हस्के यांनी नोव्हेंबर २०१४ ते मे २०१६ या कालावधीत केदारे व त्यांचा नातेवाईक स्वप्निल महेंद्र बागुल यांना विश्वासात घेऊन त्यांना इस्टर्न रेल्वेत टीसी पदावर नोकरीला लावून देतो असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी १८ लाख रुपये

ठळक मुद्दे रेल्वेत नोकरीचे आमीष'टीसी'पदाचे दिले बनावट नियुक्तीपत्र

नाशिक : सरकारी नोकऱ्यांचे आमीष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्यांची काही कमी नाही; मात्र यामध्ये आता शहरातील एका वाहतुक पोलिसाचे नाव पुढे आल्याने संताप व्यक्त होत आहे. ईस्टर्न रेल्वेत नोकरीचे आमीष दाखवून संशयित वाहतुक पोलीस रमेश मोतीगीर गोसावी याने त्याच्या साथीदार संशयित सचीन भाऊसाहेब म्हस्केच्या मदतीने हनुमानवाडीतील एका रहिवाशाला तब्बल १८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, ईस्टर्न रेल्वेत नोकरीला लावून देतो असे सांगून टीसी पदाची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नावाने बनावट ऑर्डर तयार करून संशयित गोसावी व म्हसके या जोडगोळीने दोघा सुशिक्षित बेरोजगारांना सुमारे १८ लाखांना ह्यचुनाह्ण लावल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हनुमानवाडीत राहणाऱ्या बाबाजी रामजी केदारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या दोघा संशयितांविरुध्द पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित आरोपी गोसावी व म्हस्के यांनी नोव्हेंबर २०१४ ते मे २०१६ या कालावधीत केदारे व त्यांचा नातेवाईक स्वप्निल महेंद्र बागुल यांना विश्वासात घेऊन त्यांना इस्टर्न रेल्वेत टीसी पदावर नोकरीला लावून देतो असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी १८ लाख रुपये घेऊन त्यांना गव्हर्न ऑफ इंडियाच्या नावाने ह्यटीसीह्णचे बनावट नियुक्तीपत्र दिले. ज्यावेळी फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता अशाप्रकारे कुठल्याही पदाची भरती सुरु नसल्याची त्यांची खात्री पटली आणि आपली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीसfraudधोकेबाजी