वाहतूक पोलिसांनी वर्तविले भविष्य

By Admin | Updated: January 13, 2017 01:20 IST2017-01-13T01:19:49+5:302017-01-13T01:20:03+5:30

आगळा उपक्रम : विना हेल्मेट दुचाकीस्वारांचे असेही प्रबोधन

Traffic Police Condemned Future | वाहतूक पोलिसांनी वर्तविले भविष्य

वाहतूक पोलिसांनी वर्तविले भविष्य

नाशिक : ‘काटकसर करणे तुमचा स्वभाव आहे; मात्र काटकसर कोठे करावी, याचा विचार करा, हेल्मेट खरेदी करा’, ‘तुम्ही सौंदर्याची काळजी खूप घेता, पण डोक्याच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष तुमच्या जिवावर बेतू शकते’, असे भाकीत गोदाघाटावर बसणाऱ्या ज्योतिषांनी नव्हे तर चक्क वाहतूक पोलिसांनी वर्तविले आहे.
निमित्त होते, रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत सुरक्षित वाहतुकीविषयी जनजागृती अभियानाचे. या अंतर्गत शहर वाहतूक पोलिसांकडून शहरात अभिनव संकल्पना राबविल्या जात असून, या माध्यमातून नाशिककरांचे प्रबोधन केले जात आहे. गुरुवारी (दि.१२) शहरातील एबीबी सर्कल, मायको सर्कल, कॅनडा कॉर्नर, दिंडोरी नाका आदि ठिकाणी हेल्मेट
न वापरणाऱ्या सर्व दुचाकीस्वारांसाठी ‘मोफत भविष्य पहा’ हा
जनप्रबोधन करणारा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार महिला, पुरुषांना थांबवून ‘या मोफत भविष्य जाणून घ्या’ असे सांगून थांबविले.

Web Title: Traffic Police Condemned Future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.