शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाहतूक पोलीस असुरक्षित; धक्काबुक्की करण्यापर्यंत वाढली मजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 17:30 IST

कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वार, रिक्षाचालकांकडून भर रस्त्यात वाहतूक पोलिसांच्या ‘वर्दी’वर हात घातला जात असून त्यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यापर्यंत वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांची मजल जाणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

ठळक मुद्देलागोपाठ दुसरी घटना घडल्याने संताप

नाशिक : कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वार, रिक्षाचालकांकडून भर रस्त्यात वाहतूक पोलिसांच्या ‘वर्दी’वर हात घातला जात असून त्यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यापर्यंत वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांची मजल जाणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत सलग दुसरी घटना लागोपाठ घडल्याने संताप व्यक्त होत आहे.शहर वाहतूक शाखेस नेमणूक असलेले पोलीस शिपाई मयुर राजकिशोर सिंग (२९) हे जुना गंगापूर नाका येथे शनिवारी (दि.४) आपल्या कर्तव्यावर असताना संशयित दुचाकीस्वार फिलीप चंद्रकांत धोड याने त्याच्या ताब्यातील मोपेड दुचाकी सिंग यांच्या अंगावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिलीप याने त्यांच्या शासकिय गणवेशावर हात टाकला. याप्रकरणी सिंग यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी त्याच्याविरूध्द शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.दोन दिवसांपुर्वी मॅरेथॉन चौक गंगापूररोड येथे उपनिरिक्षक जाधव हे वाहतूक नियमांची पायमल्ली करणा-या वाहनचालकांविरूध्द कारवाई करत होते. यावेळी संशयित रिक्षाचालक सुमीत हरिश गांगुर्डे (२८,रा. घारपुरे घाट, अशोकस्तंभ) याने त्याच्या ताब्यातील रिक्षा (एम.एच.१५ एफयू२०५३)मध्ये स्वत:शेजारी प्रवाशांना बसवून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करताना आढळून आला. यावेळी जाधव व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यास थांबविले व मुळ कागदपत्रांसह वाहन चालविण्याचा परवाना दाखविण्याबाबत सांगितले. यावेळी कॉन्स्टेबल काकड यांच्याशी त्याने वाद घालत मारहाण करण्याची धमकी देऊन अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला अन्य सहकारी पोलिसांनी रोखले. सरकारी काम करण्यापासून परावृत्त करत अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरूध्द जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारवाडा पोलिसांनी संशयित सुमीत यास अटक केली आहे.मानसिक खच्चीकरणशहर वाहतूक पोलीस भरदिवसा रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे कर्तव्य बजावण्यास प्राधान्य देतात तसेच नियमबाह्य वाहतूक करणाºया वाहनचालकांविरूध्द दंडात्मक कारवाई करत शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात; मात्र मागील काही दिवसांपासून शहरात वाहतूक पोलिसांसोबत हमरीतुमरी करत वाद घालत धक्काबुक्की करण्यापर्यंत वाहनचालकांची मजल गेल्याने पोलिस कर्मचा-यांने मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यांचे मनोबल ढासळत असून अशा घटना वेळीच रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीसCrime Newsगुन्हेगारी