शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांकडून मारहाण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:57 IST

वाडीवºहे येथून दुचाकीवरून दोघे मित्र पाथर्डी फाट्यावर विनाहेल्मेट आले असता त्यांना वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईसाठी अडविले, मात्र दंडाच्या रकमेइतके पैसे नसल्यामुळे त्यांनी दंड भरण्यास नकार दिला.

सिडको : वाडीवºहे येथून दुचाकीवरून दोघे मित्र पाथर्डी फाट्यावर विनाहेल्मेट आले असता त्यांना वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईसाठी अडविले, मात्र दंडाच्या रकमेइतके पैसे नसल्यामुळे त्यांनी दंड भरण्यास नकार दिला.कमी पैसे घेऊन गाडी सोडण्यास सांगितले असता एकाने मोबाइलमधून चित्रीकरण करण्यास सुरुवात केल्याचा राग येऊन वाहतूक पोलिसांनी युवकाला मारहाण केल्याचे बोलले जात आहे. मात्र वाहतूक पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी कुठलीही घटना घडली नसून अंबड पोलीस ठाण्यात संबंधित युवकांवर केवळ कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी फाटा येथून दुचाकीवरून विनाहेल्मेट प्रवास करणाºया दोघा मित्रांना अडवून त्यापैकी एका युवकाला वाहतूक पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची चर्चा शहरभर पसरली. हेल्मेट घातले नसल्याच्या कारणावरून पोलीस व युवक यांच्यात झालेल्या वादातून वाहतूक पोलिसांनी युवकास खाली पाडून बेदम मारहाण केल्याचे बोलले जाते. याबाबत सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्याकडून घडल्या प्रकाराबाबत माहिती घेतली असता त्यांनी अधिकृतपणे खुलासा केला. मारहाण झाल्याची चर्चा बिनबुडाची असून, निरर्थक आहे. वाहतूक पोलीस कोणालाही मारहाण करत नाही, केवळ दंडात्मक कारवाई करतात. त्या युवकांनी दंड भरण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी रीतसर अंबड पोलीस ठाण्यात वाहतूक नियमांचा उल्लंघन करत विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याचा गुन्हा दाखल केला आहे.युवकांनी पोलिसांचे मोबाइलने चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. त्याचा राग मनात धरून त्यांनी वाहतूक पोलिसांविषयी चुकीची माहिती देत विनाकारण समाजात प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती घेतली जात असून, दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीरपणे कठोर कारवाई केली जाणार असल्याचे नखाते यांनी सांगितले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय