गोविंदनगर परिसरात वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:03+5:302021-02-05T05:40:03+5:30
शहरातील गंगापुररोड, कॉलेज रोडला पर्याय म्हणून मुंबई-आग्रा महामार्गानजीक वसलेल्या गोविंदनगर परिसराने झपाट्याने कात टाकली असून, अनेक मोठ्या सोसायट्या, कॉलनी ...

गोविंदनगर परिसरात वाहतुकीची कोंडी
शहरातील गंगापुररोड, कॉलेज रोडला पर्याय म्हणून मुंबई-आग्रा महामार्गानजीक वसलेल्या गोविंदनगर परिसराने झपाट्याने कात टाकली असून, अनेक मोठ्या सोसायट्या, कॉलनी तयार झाल्या आहेत. मुख्य रस्त्यावरील इमारतीत व्यावसायिक वापर सुरू झाल्याने या रस्त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. हॉटेल, रुग्णालये, शोरूम अशा विविध प्रकारची दुकाने सुरू झाली असून, रस्त्यावरच फेरीवाले ठाण मांडून आहेत. त्यामुळे प्रचंड वर्दळीच्या असलेल्या या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावरील दुकानांसमोरच ग्राहक वाहने उभी करीत असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. गोविंदनगर परिसरातील रस्त्यांची रुंदी वाढली असली, तरी जुन्या इमारतींमध्ये पार्किंग व्यवस्था कमी नसल्याने नागरिकांना रस्त्यावर पार्किंग करावी लागते. विशेषतः सकाळ, सायंकाळी मिठाईचे दुकानांभोवती गर्दी होऊन त्याचा परिणाम रस्ता वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे या मार्गावरील बेशिस्त वाहतुकीला चाप लावून वाहतुकीची कोंडी फोडावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.