घोटीत वाहतुकीची कोंडी सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:34 IST2020-10-14T21:51:52+5:302020-10-15T01:34:23+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील प्रमूख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न वाढत असल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. लोकमतने वाहतूक कोंडी चा प्रश्न मांडताच प्रशासन यंत्रनेणेला जाग येऊन धडक मोहीम राबवित रस्त्यावर बेवारस गाड्यावर, बसणाऱ्या दुकानंदारांवर, मास्क न लावणाºया नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आणि दंड आकारून यापुढे असे वर्तन करू नये म्हणून समज देण्यात आली.

घोटी शहरातून रस्त्यावरील दुकानंदारांवर कारवाई चा बडगा उगारतांना लता गायकवाड, जालिंदर पळे, भारत वेंदे, अण्णा पवार, सचिन गोनके आदी.
(प्रभाव लोकमतचा)
घोटी : इगतपुरी तालुक्यातील प्रमूख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न वाढत असल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. लोकमतने वाहतूक कोंडी चा प्रश्न मांडताच प्रशासन यंत्रनेणेला जाग येऊन धडक मोहीम राबवित रस्त्यावर बेवारस गाड्यावर, बसणाऱ्या दुकानंदारांवर, मास्क न लावणाºया नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आणि दंड आकारून यापुढे असे वर्तन करू नये म्हणून समज देण्यात आली. घोटी शहराचा वाहतुकीचा प्रश्न मार्र्गी लावण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर बसलेल्या दुकानदारांवर कडक कारवाही ग्रामपालिकेच्या कार्यालयापासून वासुदेव चौक, गणपती मंदिर, सराफ गल्ली, मेन रोड, भंडारदरा रोड, मस्जिद रोड, जैन मंदिर अशा विविध ठिकाणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पंचायत समितीच्या गटविकासअधिकारी लता गायकवाड व घोटी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सहायक गटविकास अधिकारी भारत वेंदे, पंचायत समिती सदस्य अण्णा पवार, सरपंच , सचिन गोनके, ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे व कमर्चारी यांनी मोहीम राबविली.
या मोहिमेत रस्त्यावरील दुकाने, विना मास्क नागरिक, रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा आणणारे वाहन चालक यांच्यावर दंडात्मक कारवाही करण्यात आली. ५२ लोकांवर कारवाही करून १७ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आली. शहरातील नागरिकांनी आज आयोजित केलेल्या धड़क मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले असून वाहतूक कोंडी होउ नये या करिता प्रशासनाने सतत अश्या प्रकारची मोहिम राबवावी अशी मागणी करण्यात आली.