रस्त्यावर भाजीबाजारामुळे वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 04:43 PM2020-09-19T16:43:14+5:302020-09-19T16:46:12+5:30

पंचवटी : दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढल्याने आठवडे बाजारसह अन्य रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजाराला मनपा प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे.

Traffic jam due to vegetable market on the road | रस्त्यावर भाजीबाजारामुळे वाहतूक कोंडी

रस्त्यावर भाजीबाजारामुळे वाहतूक कोंडी

Next
ठळक मुद्देदिंडोरीरोड, पेठरोडवर भाजीबाजार: प्रशासनाची डोकेदुखी

पंचवटी : दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढल्याने आठवडे बाजारसह अन्य रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजाराला मनपा प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे. बाजारसमितीत देखिल किरकोळ शेतमाल विक्री करणाºया शेतकऱ्यांमुळे फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडत असल्याने बाजारसमितीत सुरुवातीला काही दिवस किरकोळ शेतमालाची विक्री करण्यास मनाई केली होती मात्र बाजारसमितीने किरकोळ विक्रेत्यांना बाजारसमितीत परवानगी दिली असली तरी आता भरेकरी व किरकोळ विक्री करणारे थेट वाहतुकीची वर्दळ असलेल्या मुख्य रस्त्यावर बाजार भरवत वाहतूक कोंडी निर्माण करत असल्याचे चित्र दिसते. दिंडोरीरोड तसेच दिंडोरीरोड ते पेठरोडला जोडल्या जाणाºया आणि पेठरोडवरील बाजारसमिती बाहेर रस्त्यावर भाजी विक्रेते ठाण मांडून बसत असल्याने विक्रेते व ग्राहक फिजिकल डिस्टनसिंग नियम पायदळी तुडवत असल्याने महापालिका प्रशासनाची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहे. अतिक्रमण विभागाने कारवाई केल्या नंतर देखिल काही वेळ लोटत नाही तोच पुन्हा विक्रेते त्याच जागेवर भाजीपाला विक्री करत असल्याचे दिसून येते.काही दिवसांपूर्वी आडगाव शिवारातील कोणार्कनगर येथे दैनंदिन भाजीपाला विक्री करत आठवडे भाजीबाजार भरविणाºया विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याने भाजीपाला विक्री करणाºयांनी थेट मनपाच्या पथकावर हल्ला चढविल्याची घटना घडली होती.दिंडोरीरोड, पेठरोड पाठोपाठ हिरावाडीरोड तर कधी पेठरोड आरटीओ आॅफिस समोरील रस्त्यावर व तारवाला लिंकरोडला बसणाºया भाजीपाला विक्री करणाºयामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असते. पेठरोडवरील आरटीओ कार्यालय समोरील रस्ता, दिंडोरीरोड भागात दैनंदिन सकाळच्या वेळी रस्त्यावरचा भाजीबाजार दिसून येतो. दिंडोरीरोडवर असलेल्या मुख्य बाजारसमिती बाहेर देखिल सकाळी, दुपारी शेकडो भाजीपाला विक्रेते रस्त्यावर बसलेले असतात एका बाजूला भाजी विक्रेते तर दुसºया बाजूने वाहनांची वर्दळ सुरू असल्याचे चित्र दिसून येते. दैनंदिन रस्त्यावर भरणाºया भाजीबाजारामुळे वाहतूक कोंडी निर्माण तर होते शिवाय भाजीपाला विक्रे करणारे रोजच उरलेला भाजीपाला व सडका शेतमाल रस्त्यावर फेकत असल्याने रस्त्यावर मोकाट जनावरे संख्या वाढली आहे तर जागोजागी खराब भाजीपाला पडलेला असतो.

Web Title: Traffic jam due to vegetable market on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.