वाहतूक कोंडीची समस्या वाढली
By Admin | Updated: November 9, 2014 01:04 IST2014-11-09T01:03:45+5:302014-11-09T01:04:25+5:30
वाहतूक कोंडीची समस्या वाढली

वाहतूक कोंडीची समस्या वाढली
नाशिक : अशोकस्तंभ ते रविवार पेठ कॉँक्रिटीकरणास सुरुवात झाल्यानंतर येथील वाहतूक कोंडीची समस्या वाढली तर आहेच; परंतु कॉँक्रिटीकरणानंतरही ती सुटेल किंवा नाही हे सांगता येत नाही. त्यातच आधी रुंदीकरण आणि मग काँक्रिटीकरण असे केल्यास काही प्रमाणात वाहतूक सुसह्य होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या विषय स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी सोमवारी संबंधितांची बैठक पालिकेने बोलावली आहे. त्यात हा निर्णय होणार आहे.
अशोकस्तंभ ते रविवार कारंजा दरम्यान कॉँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. कामाला सुरुवात होऊन अवघे काही दिवस झाले आहेत; परंतु प्रारंभीच इतक्या समस्या जाणवत आहे की, हे सदरचे काम पूर्ण होईपर्यंत म्हणजे किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असून, तोपर्यंत वाहतुकीचे काय होणार या कल्पनांनीच नागरिक अस्वस्थ होत आहेत. अशोकस्तंभ ते रविवार कारंजा अंतर फारसे नसले तरी नाशिक शहराकडून पंचवटीकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. बसगाड्या तसेच अन्य वाहनांच्या गर्दीमुळे हा एकेरी मार्ग असतानाही कोंडी होते. त्यातच ही घाऊक बाजारपेठ असल्यानेदेखील अनेक समस्या निर्माण होतात.