गंगापूर रोड हा शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. अशोक स्तंभापासून तर थेट जेहान सर्कलपर्यंत गंगापूर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मॅरेथॉन चौकापासून तर थेट केटीएचएम महाविद्यालयापर्यंत रस्त्यालगत भूमिगत केबल टाकण्याकरिता खोदकाम केले जात आहे. यामुळे सकाळी अकरा ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत या रस्त्यावर वाहतुकीचा बोजवारा उडालेला पहावयास मिळतो; मात्र याकडे कोणतीही शासकीय यंत्रणा लक्ष देण्यास तयार नसल्याने संताप व्यक्त होत आहे. एकीकडे खोदकामामुळे रस्त्याची बरीच जागा व्यापली गेली असताना दुसरीकडे उर्वरित रस्त्यावर चारचाकी वाहनचालकांकडून सर्रासपणे रस्त्यावर एका रांगेत वाहने सर्रास उभी केली जातात. यामुळे वाहतुकीला मोठा अडसर निर्माण होत आहे. वाहतूक कोंडी हाेऊन अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
शहरातील पंडित कॉलनी, शरणपूर रोड, कॉलेज रोड, सावरकरनगर, थत्तेनगर या सर्व भागांमध्ये जाण्यासाठी गंगापूर रोडचा वापर केला जातो. तसेच आनंदवली, सोमेश्वर, नवश्या गणपती, गंगापूर गाव, गोवर्धन, दुगाव, गिरणारे, वाघेरा, हरसूल या ग्रामीण भागांमध्ये जाणारी वाहनेसुद्धा याच रस्त्याने मार्गस्थ होतात. यामुळे गंगापूर रोडवर दिवसभर हलक्या व मोठ्या वाहनांची वर्दळ पहावयास मिळते. मॅरेथॉन चौकापासून सुरु असलेले खोदकाम तातडीने पूर्ण करावे तसेच सरकारवाडा पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरही खोदकाम केले जात असून येथेही वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
---इन्फो---
वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका
महाविद्यालये, शाळा, रुग्णालये, आयुक्तालय, पोलीस ठाणे, सभागृह, उद्याने, मैदान गंगापूर रोडला लागून आहे. यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झालेला असतो तरी देखील अवैधरित्या सर्रासपणे वाहनांची पार्किंग केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने या गंभीर बनलेल्या समस्येकडे तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
----
फोटो आर वर ०३गंगापूर रोड नावाने सेव्ह केला आहे.
===Photopath===
030221\03nsk_11_03022021_13.jpg
===Caption===
गंगापुरोडवर उभी असलेली अवैध वाहने