मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी
By Admin | Updated: October 10, 2016 02:27 IST2016-10-10T02:26:08+5:302016-10-10T02:27:40+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी
नाशिक : तळेगाव अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी होत असलेल्या जाळपोळ व वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक तीन हा रविवारी (दि़९) दुपारी बारा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद करण्यात आला होता़ या महामार्गास येऊन मिळणारे रस्तेही बंद करण्यात आले होते़
सायंकाळी सहानंतर हा मार्ग सुरू करण्यात आला होता; मात्र गोंदे ते पाडळी या ठिकाणी रात्री आठ वाजेच्या सुमारास पुन्हा तोडफोड सुरू झाल्याने तो पुन्हा बंद करण्यात आला़ दरम्यान, ठाणे येथील रस्ते पोलीस महामार्ग कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार नाशिक ते मुंबई हा मार्ग सुरू करण्यात आला असून मुंबई ते नाशिक बंदच आहे़ या मार्गावरील तोडफोडीच्या घटना बंद झाल्याशिवाय वाहतूक पूर्ववत सुरू करणे शक्य नसून येथील कोंडी कमी होणार नाही़