नाशिक : शहरात पारंपरिक शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी विविध शिवजन्मोत्सव मंडळांतर्फे पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्यात आले आहे.
शासनाने शाळा, मंदिरे, बाजारपेठा व थिएटर यांना परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे सर्व शिवजन्मोत्सव मिरवणुकींनाही परवानगी मिळवून देण्याची मागणी या शिवभक्तांनी केली आहे. पुढील वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे परवानगी मिळणार नाही. त्यामुळे शिवभक्तांच्या भावनांची दखल घेऊन मिरवणुकीस परवानगी मिळवून द्यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या वेळी नाशिकमधील छत्रपती सेना, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती, नवीन नाशिक शिवजन्मोत्सव समिती, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, भोई समाज मित्र मंडळ, शिवसाई फ्रेंड सर्कल, लष्कर ए शिवबा, अशोकस्तंभ साईबाबा मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ, जुने नाशिक फ्रेंड सर्कल, अर्जुन क्रीडा मंडळ, आत्मविश्वास व्यायामशाळा, गर्जना युवा प्रतिष्ठान, हिंदसम्राट मित्र मंडळ, धर्मवीर ग्रुप सिडको आदी शिवजन्मोत्सव समिती व मंडळांसह अंबड शिवजन्मोत्सव समिती, मराठा मित्र मंडळ सातपूर, शिवा भागवत मित्र मंडळ, जगताप मळा फ्रेंड सर्कल, शिवजयंती उत्सव समिती, देवळाली गाव व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
(आरफोटो- २४शिवजन्मोत्सव)