पेठ तालुक्यात पारंपरिक दहीहंडी
By Admin | Updated: August 26, 2016 22:12 IST2016-08-26T22:10:13+5:302016-08-26T22:12:03+5:30
पेठ तालुक्यात पारंपरिक दहीहंडी

पेठ तालुक्यात पारंपरिक दहीहंडी
पेठ : पेठच्या आदिवासी वाडी- वस्त्यांवर पारंपरिक पध्दतीने दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी बाळगोपांळांनी गर्दी केली होती.
आदिवासी वाडी-वस्त्यांसह गावातील सार्वजानिक ठिकाणी व चौकात सडा सारवन करु न वारली पध्दतीने रांगोळया काढण्यात आल्या. परिसरातील झाडांला पताके व रंगीत फुग्यांनी सजवलेली दहीहंडी बांधण्यात आली. दुपारनंतर पाराजवळ गावातील सर्व बालगोपाळ जमा झाले. नंतर टाळ मृदंगाच्या ठेक्यावर पारंपरिक नृत्य आविष्कारात दहीहंडी फोडण्यासाठी थर रचण्यात आले.
भजनी मंडळांनी श्रीकृष्णाच्या गौळणी गायल्या. महिलांनी फुगड्यांच्या गिरक्या घेतल्या. सायंकाळी अतिशय धार्मिक वातावरणात श्रीकृष्णाचा गजर
करीत दहीहंडी फोडण्यात
आली. सर्व गावाला प्रसाद वाटप करून रात्री जागरण, हरिपाठ,
भारूड असे धार्मिक कार्यक्र म साजरे झाले. (वार्ताहर)