सम-विषम पद्धतीला व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:56 IST2020-06-22T21:14:11+5:302020-06-22T22:56:14+5:30

कळवण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सम-विषम तारखांनुसार कळवण शहरात दुकाने सुरू राहणार असून, याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कळवणचे प्रांतधिकारी विजयकुमार भांबरे यांनी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाची कळवण नगरपंचायत हद्दीत अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्य अधिकारी सचिन माने यांनी दिली. दरम्यान, या सम-विषम धोरणाला कळवण शहरातील व्यापारी बांधवांनी मात्र विरोध दर्शविला आहे.

Traders oppose the even-odd system | सम-विषम पद्धतीला व्यापाऱ्यांचा विरोध

सम-विषम पद्धतीला व्यापाऱ्यांचा विरोध

ठळक मुद्देकळवण : नगरपंचायत अंमलबजावणीसाठी सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सम-विषम तारखांनुसार कळवण शहरात दुकाने सुरू राहणार असून, याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कळवणचे प्रांतधिकारी विजयकुमार भांबरे यांनी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाची कळवण नगरपंचायत हद्दीत अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्य अधिकारी सचिन माने यांनी दिली. दरम्यान, या सम-विषम धोरणाला कळवण शहरातील व्यापारी बांधवांनी मात्र विरोध दर्शविला आहे.
राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली, मात्र त्याचा उलटा परिणाम झाला. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करून नियम धाब्यावर बसवल्यामुळे जिल्हा प्रशासनाने खंबीर भूमिका घेऊन नगरपंचायत हद्दीतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सम-विषम धोरण आखले. आता या धोरणाची अंमलबजावणी करण्याची सूचना तहसीलदार बी. ए. कापसे यांनी कळवण नगरपंचायत प्रशासनाला दिली आहे.
कळवण शहरातील व्यापारीपेठा सुरू झाल्यामुळे तालुक्यातील व शहरातील नागरिकांची सकाळी ९ ते ५ या वेळात प्रचंड गर्दी वाढली. सातत्याने वाढणाºया गर्दीमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.पूर्व पश्चिम लेन रस्त्याच्या दुतर्फा उत्तराभिमुख सम तारखेला व पश्चिमाभिमुख दुकाने विषम तारखेला सुरु राहतील. दक्षिण उत्तर लेन रस्त्याच्या दुतर्फा पूर्वाभिमुख सम तारखेला व पश्चिमाभिमुख दुकाने विषम तारखेला सुरू राहतील. पूर्व पश्चिम लेनमध्ये मेनरोड, शाहीर लेन, सुभाषपेठ, वडगल्ली, गांधी चौक ते मेनरोड पूल, एकलहरे रोड या परिसराचा समावेश आहे. दक्षिण-उत्तर लेनमध्ये जुना ओतूर रोड, सबस्टेशन रोड, नवीन ओतूर रोड, नाकोडा रोड या परिसराचा समावेश आहे.

Web Title: Traders oppose the even-odd system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.