शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

नाशकातील दुकाने १० ते ५  सुरू ठेवण्याचा व्यापारी संघटनांचा ठराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 7:14 PM

नाशिकशहरातील दुकाने सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय शहरातील व्यापारी संघटनांनी घेतला आहे. कोरोना महामारीचा प्रभाव लक्षात घेऊन कोरोनाची व्यापारी संघटनांनी हा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देदुकाने सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहाणार पालकमंत्र्यांसोबत बैठकीनंतर व्यापारी संघटनांचा ठराव

नाशिक : नाशिकमधील कोरोना महामारीचा प्रभाव लक्षात घेऊन कोरोनाची साखळी तुटण्यासाठी काही दिवस शहरातील दुकाने सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय शहरातील व्यापारी संघटनांनी घेतला आहे. महापालिकेने बंधनकारक केलेली सम-विषम तारखेला दुकाने सुरू ठेवण्याची पद्धत बंद करावी व दुकानाची वेळ सकाळी १० ते ५ अशी करण्यात यावी अशी मागणी व्यापारी संघटनांनी पालकमंत्री छगन भूजबळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.26)झालेल्या बैठकीत केली. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त  विश्वास नांगरे पाटील, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अष्टेकर, उपस्थित होते. दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र चेंबरच्या कार्यालयात विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीचा तपशील पालकमंत्र्यांना देण्यात आला. त्यांनंत छगन भूजबळ यांनी आर्थिक चक्र सुरु व्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉक डाउन उठवून सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या व्यवहारास मुभा दिली असल्याने नमूद केले.े त्यामुळे पुन्हा लॉक डाउन करणे किंवा सम विषम तारखेचा निर्णय बदलणे तूर्त शक्य नसले तरी लवकरात लवकर त्यावर विचार करून निर्णय घेऊ असे अाश्वासन दिले.  तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकडे लक्ष व्यापाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. दुकानाच्या वेळेबाबत व्यापाऱ्यांनी सर्वांनी निर्णय घेऊन ठरवावे असे आवाहन त्यानी केले. त्यानंतर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी सम-विषम दिवसाचे बंधन काढून दुकानाची वेळ १० ते ५ करण्याचा ठराव मंजूर केला. यावेळी प्रफुल्ल संचेती, महेंद्र पटेल, शरद मिश्रा,  मदन पारेख,  नंदू पारेख, विजय कुलकर्णी,  संतोषकुमार लोढा, कैलास चावला,  राजेंद्र फड,  राजेश मालपुरे, मनोज कोतकर, वेदप्रकाश सहगल,  गिरीश नवसे,  शांताराम घंटे,  राजन दलवानी, रामनाथ मुंदडा, सतीश अग्रवाल,  विजय खडके,  एकनाथ अमृतकर, जुझार ढोर्जीवाला,  मंगेश वझट आदिसह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :MarketबाजारNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याChagan Bhujbalछगन भुजबळSuraj Mandhareसुरज मांढरेVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील