कारच्या धडकेत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू
By Admin | Updated: October 27, 2015 23:06 IST2015-10-27T23:05:47+5:302015-10-27T23:06:10+5:30
कारच्या धडकेत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

कारच्या धडकेत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू
लासलगाव : पंचर झालेल्या ट्रॅक्टरचे चाक खोलत असताना पाठीमागून आलेल्या कारने धडक दिल्याने ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला तर कार मधील चौघे जखमी झाले.
हा अपघात लासलगाव-चांदवड रोडवरील गायकर पेट्रोल पंपासमोर सोमवारी रात्री दहाच्या सुमारास झाला. चांदवडकडून शेणखत घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक पंक्चर झाल्याने ते खोलत असताना पाठीमागून आलेल्या कार (क्र. एम.एच.१२/३०००) ने धडक दिल्याने संजय रावसाहेब धोमसे, रा. धारणगाव खडक हे जागीच ठार झाले. तर कारमधील शौकत हैदर शेख, मुश्ताक बिलाल पठाण, रमजू बाबू शेख, वशिम शौकत शेख रा.लासलगाव हे जखमी झाले. जखमींवर लासलगाव रुग्णालयात प्रथमोपचार करुन शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातातील मयत संजय धोमसे यांच्यावर धारणगाव खडक येथे अंतिम संस्कार करण्यात आले. लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप, उपनिरीक्षक दिपक आवारे तपास करीत आहे. (वार्ताहर)