शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
8
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
9
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
10
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
11
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
12
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
13
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
14
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
15
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
16
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
17
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
18
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
19
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
20
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

पर्यटकांना ८० लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 01:13 IST

श्रीलंकेला पर्यटनासाठी नेण्याचे आमिष दाखवून एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या महिला संचालकाने शहरातील १३ पर्यटकांना सुमारे ८० लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दातार ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड कन्सलटन्सी प्रा. लि. टुर कंपनीच्या लेखा कुलकर्णी ऊर्फ लेखा निनाद शहा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देआमिष : १३ ग्राहकांची फसवणूक

गंगापूर : श्रीलंकेला पर्यटनासाठी नेण्याचे आमिष दाखवून एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या महिला संचालकाने शहरातील १३ पर्यटकांना सुमारे ८० लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दातार ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड कन्सलटन्सी प्रा. लि. टुर कंपनीच्या लेखा कुलकर्णी ऊर्फ लेखा निनाद शहा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.गंगापूररोडजवळील गणेशनगर परिसरातील रहिवासी संजीत दिलीप बेझलवार (३२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना ३१ डिसेंबरनिमित्त सहकुटुंब परदेशात सहलीसाठी जायचे होते. त्यानुसार त्यांनी श्रीलंकेत जाण्यासाठी चौकशी केली व आॅनलाइन तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून तिकीट बुक न झाल्याने मित्राने सांगितल्याप्रमाणे त्यांनी डिसूजा कॉलनीतील दातार ट्रॅव्हल्स कंपनीसोबत संपर्क साधला. कंपनीच्या संचालक लेखा यांनी २७ डिसेंबर ते ३ जानेवारी श्रीलंका येथे नेण्याचे आश्वासन दिले. तसेच आॅनलाइन तिकीट बुक करून देऊ, असेही सांगितले. त्यासाठी संजीत यांच्यासह त्यांच्या नातलगांचे तिकीट काढण्यासाठी लेखा हिने ६ लाख २४ हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार संजीत यांनी आॅनलाइन पद्धतीने ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले. त्यानंतर संजीत यांनी पाठपुरावा केला असता लेखा हिने त्यांना विमानाचे तिकीट दिले नाही किंवा इतर कोणतेही कागदपत्रे दिली नाहीत. १९ डिसेंबरला संजीत यांनी कार्यालयात गेले असता कार्यालय बंद आढळले. त्यामुळे लेखा हिने १३ पर्यटकांना सहलीला नेण्याचे आमिष दाखवून ७९ लाख ५० हजार १०० रु पयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गंंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी