शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

उत्पन्न वाढविण्याचे आयुक्त मुंढेंसमोर तगडे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 15:03 IST

महापालिका : अंदाजपत्रकातील संकल्पपूर्तीसाठी मार्ग खडतर

ठळक मुद्देसन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १७८५.१४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादरनाशिककरांवर वेगवेगळ्या सेवा-सुविधांच्या माध्यमातून करवाढीचे संकेत

नाशिक - महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १७८५.१४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले असले तरी, सद्यस्थितीत १३०० कोटी रुपये उत्पन्न पाहता उर्वरित सुमारे ५०० कोटी रुपये वर्षभरात उभे करण्याचे तगडे आव्हान आयुक्तांसमोर असणार आहे. प्रसंगी कटू निर्णय घ्यावे लागतील, असे स्पष्ट करत आयुक्तांनी नाशिककरांवर वेगवेगळ्या सेवा-सुविधांच्या माध्यमातून करवाढीचे संकेत दिले आहेत. मात्र, उपलब्ध मनुष्यबळात अंदाजपत्रकातील संकल्पपूर्तीसाठी मार्ग खडतर मानला जात आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी (दि.२२) स्थायी समितीला महापालिकेचे १७८५.१४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक १४५३.३९ कोटी रुपयांवर गेले आहे. प्रत्यक्षात तत्कालिन आयुक्तांनी ते १४१० कोटी रुपयांचे सादर केले होते. मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कामांची गरज, निधीची उपलब्धता आणि व्यवहार्यता या त्रिसूत्रीचा अवलंब करणार असल्याचे जाहीर करतानाच जेवढे उत्पन्न प्राप्त होईल, तेवढाच खर्च होईल, असे धोरण स्पष्ट केले होते. आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर करताना महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात उत्पन्न १५३५.९५ कोटी रुपये अपेक्षित धरले आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष उत्पन्न हे १२९६ कोटी रुपये प्राप्त होणार आहे. त्यात आयुक्तांनी २३९ कोटी रुपयांची भर घालत प्रत्यक्ष उत्पन्न १५३५ कोटी रुपये गृहित धरले आहे. मात्र, अंदाजपत्रक १७८५ कोटी रुपयांचे सादर करताना सद्यस्थितीतील उत्पन्नाच्या तुलनेत सुमारे ५०० कोटी रुपये उभे करण्याचे तगडे आव्हान आयुक्तांपुढे आहे. उत्पन्नाची जमवाजमव करताना आयुक्तांनी प्रामुख्याने घरपट्टी आणि पाणीपट्टीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात आजवर घरपट्टीच्या माध्यमातून महापालिकेला १०० कोटी रुपयांचा आकडा ओलांडता आलेला नाही. मात्र, आयुक्तांनी चालू आर्थिक वर्षात तब्बल २५३ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे. त्यामुळे, थकबाकीदारांवर कठोर कारवाई होणार हे जवळपास निश्चित आहे. याशिवाय, पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्टय यंदा ६० कोटी रुपये अपेक्षित धरले आहे. मागील वर्षी ४१ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, ३२ कोटी रुपयांवर उत्पन्न जाऊ शकलेले नाही. जाहिरात होर्डींग्ज, वाहनतळ शुल्क, नगररचना विकास शुल्क, अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, व्यावसायिकांना परवाना शुल्क, मनपा गाळे भाडे, मनपा मालकीच्या इमारतींचा लिलाव यासारख्या माध्यमातूनही आयुक्तांनी उत्पन्नाचे मार्ग प्रस्तावित केले आहेत. मात्र, सारा भार हा वसुलीवरच असल्याने आयुक्तांना उपलब्ध मनुष्यबळात उत्पन्नवाढीचे हे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे